Dr. Arun Halbe

Dr.Arun Halbe

Chairman

Dr. Rajan Sancheti

Dr.Rajan Sancheti

Co-Chairman

आपले देहदान अवयवदान देईल ४३ जणांना   जीवनदान

 

सज्जनहौ! खूप वर्षांपासुन नेत्रदान अवयवदान प्रचलित आहे! आता आधुनिक वैद्यकशाश्त्राच्या मदतीने अवयवदानही शक्य झाले आहे. दानाचे महत्व आपणांस विदित आहेच! म्रुत्युपश्च्यातही ईश्वरी देणगी मिळालेला देहत्वचा, नेत्र, ह्रुदय, किडनी, लिव्हर . गरजू रुग्णास देऊन आपण देहरूपी जगू शकतो! किती रम्य कल्पना!

 याला सर्व धर्मांचीबौद्ध, ख्रिस्ती, मुस्लिमपूर्ण संमती आहे हे मी शाश्ट्राधारे नमूद करतो! आता हे कसे करावे ते सांगतो

     महर्षी दधीची नी योगबलाने प्राणत्याग करून इंद्रदेवास आपल्या शक्तीशाली अस्थी दान केल्या! तद्नंतर विष्वकर्म्याने त्यापासून इन्द्रासाठीवज्रबनवले! त्या दैवी शश्त्राच्या सहाय्याने इँद्रदेवाने व्रूत्रासूराचा नाश करून तिन्ही लोक मुक्त केले! या पुराणकथेनुसारमहर्षी दधीचीआद्य देहदाता!

       आपणही जिवंतपणीरक्तदानकरून एखाद्या रुग्णांचे प्राण वाचवू शकतो. रक्तदान वय वर्षें १८६५ ची कोणीही व्यक्ती करू शकते! सर्व योग्य तपासनीनन्तरच फक्त ३००मि. ली.(साधारणतः ५०००मि. ली. आपल्या शरीरात असते) एवढेच रक्त एकावेळी घेतात! आपले रक्तद्रव्य नॉर्मल रहाते! निरोगी रहातो!. वर्षातून महिन्याच्या अंतराने वेळा आपण रक्तदान करू शकतो .पुण्यात २५तरी रक्तपेढ्या आहेत. जवळच्या रक्तपेढीत अवश्य (निदान वाढदिवशी) रक्तदान करावे .

       तसेच आपण निरोगी असल्यास लिव्हर(यक्रुत) चा एक छोटासा तुकडा गरजू नातलग, मित्र रुग्णास दान करू शकता! त्याप्रमाणेच निसर्गाने आपणांस दोन मुत्रपिन्डे(किडनी) दिलीत त्यातले एक मूत्रपिंड गरजू नातलग/मित्र यांना देऊन उरलेले आयुष्य निर्वेध जगू शकता! त्याचप्रमाणे त्वचापेढीत त्वचादानही करू शकता!

                 “देहदान

हे मात्र म्रुत्युपश्च्यात! अनेक वर्षें प्रचलित आहे! प्रमाण अजूनही अत्यल्प आहे! वैद्यकशाश्ट्राच्या विद्यार्थ्यास शरीररचनाशाश्ट्र्याचे(Anatomy) प्रत्यक्ष द्न्यानासाठी खूपच उपयोगी! उत्तम प्रशिक्षित डॉक्टर होण्यासाठी देहदान अत्यंत आवश्यक आहे! आपल्या पुण्यात सर्व वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्वीकारतात! मात्र म्रुत्यु पश्यात लवकरात लवकर, साधारणतः दोन तासांत देहदान करावे, त्यायोगे त्या देहावरील प्रक्रिया देह टिकून रहाण्याच्या औषध प्रक्रियेसाठी पुरेसा वेळ मिळतो! देहदानासाठी म्र्युत्युदाखला(Death Cert.) आवश्यक असतो मात्र!

      अपघाती म्रुत्यु, क्षयरोग, गंग्रीन, कावीळ, HIV,डेंग्यू, बेड सोर्स . कारणाने म्रुत्यु आल्यास देहदान, नेत्रदान, त्वचादान होऊ शकत नाही याची नोंद घ्यावी!

                  “नेत्रदान

हे मात्र म्रुत्युपश्यातच! यासाठी आपला द्रुढसन्कल्प आपल्या वारसांना अवश्य सांगावा तसेच महिन्यातून निदान वेळा तरी आठवण द्यावी! जवळच्या नेत्रपेढीचे नांव, पत्ता, फोन नं. ठळकपणे घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावावा! डोळ्यांतील फक्त पारदर्शक बुब्बुल (Cornia) दानासाठी उपयुक्त! बाकीच्या कोणत्याही भागाचा उपयोग नसतो! म्रूत्यूपश्यात तासांत नेत्रदान करावे! अन्यथा कॉर्निया कोरडा/खराब होतो

त्यासाठी पुढील काळजी घ्यावी!—मस्तक ऊशीवर ठेवावे, डोळे मिटल्या स्थितीत ठेऊन त्यावर पाणी, खोबरेल तेल, दुधाच्या कापडी/कापसाच्या पट्टया ठेवाव्या! A.C.चालू ठेवावा,पंखा मात्र बंद ठेवावा!

      फोन केल्यावर नेत्रपेढीतील डॉ.येवून डोळे/कॉर्निया काढून नेतील! कर्करोग, HIV,संसर्गजन्य आजार यांचे रिपोर्ट काढून ठेवावेत! शक्यतर डॉ.रक्ताचा नमुनाही घेतील! ज्यायोगे दान स्वीकारनर्यास कोणताही त्रास होऊ नये!

श्रीलंकेसारखा छोटा देश स्वतः ची गरज भागवून  कॉर्निया जवळच्या देशांना निर्यात करतो! तेथे प्रत्येक म्रुत्यु नंतर नेत्रदान होते! आपल्याकडे अशी व्यवस्था व्हावी!

ग्रामीण भागासाठी नेत्रदान मुदत म्रुत्युपश्च्यात तास अशी आहे! नेत्रदानासाठी वयोमर्यादा नाही!

      ——  त्वचादान——–

नेत्रदानाईतकेच महत्वाचे! कर्णानेकवचकुन्डलेदान केली होती इंद्रदेवास! मात्र २तासांत म्रुतदेह त्वचापेढीत नेल्यास! तद्नंतर त्वचा कडक होऊन त्वचा काढणे शक्य नसते! सबंध शरीराची त्वचा काढत नाहीत! फक्त पोट, पाठ, छाती, मांड्या यावरची त्वचा दानासाठी योग्य असते! तत्पश्च्यात पूर्ण ड्रेसिंग करूनच देह वारसांच्या हवाली करतात! रक्ताचा टिपुसही दिसत नाही! त्वचादानानंतरही देहदान करण्यास हरकत नसते! रक्तपेढीत तण्त्रद्ण्य असल्यास घरीही त्वचादान होऊ शकते!भाजलेल्या रुग्णास तर हे वरदानच! ४०५० % भाजलेल्या रुग्णास आधुनिक औषधोपचार खात्रीने वाचवू शकत नाहीत! त्वचादानाने देहाची मोडकळीस आलेली तटबंदी पूर्ववत होऊन रुग्ण बचाऊ शकतो! पुण्यातसूर्य हॉस्पिटल, दीनानाथ, सह्याद्री येथेच फक्त सुविधा उपलब्ध आहे!

      नेत्रदान, त्वचादान,अवयवदान यानंतर देह पुढील क्रियाकर्मासाठी वारसास मिळतो! देहदानानंतर नाही!

         ———-अवयवदान———-

आधुनिक वैद्यकशाश्ट्राच्या मदतीने आता म्रुत्युपश्च्यातअवयवदानशक्य झालंय! म्रुत्युपश्च्यात ईश्वरी देणगी मिळालेले निरोगी जिवंत अवयव दान करून अन्य गरजू रुग्णांचे जिवन सुसह्य, आनंदी, उपयुक्त करू शकतो ही भावनाच किती दिव्य, समाधानी आहे ना!

     कोणी करावे?—–पूर्ण वाढ झालेल्या १८ वर्षावरील व्यक्तीने! आता तर काही मातापित्यांनी आपल्या बालकांचे अवयवदान अधिक्रुतपणे केल्याची उदाहरणे आहेत!

        कोणी करू नये?—–क्षयरोगी, अनियंत्रित मधुमेही, जंतुसंसर्ग रुग्ण,HIV ग्रस्त, जाग्रुत कर्करौगी!

         सर्वप्रथम स्वतः निश्चय करा! वारसांची संमती घ्या! ” संकल्प फॉर्मभरा, संमतीपत्र कार्ड, वारसांची नांवे (),पत्ता, मोबाईल नं., सही कायम शरीरावर बाळगा/घरांत ठळक ठिकाणी लावा .

        कोणते अवयव दान होते?—–अवयवमुत्रपिन्डे, ह्रुदय, फूफूसे, स्वाडुपिन्ड, बीजान्डकोश(Ovaries),आतडी,

        पेशीसमूहबुब्बु(Cornea),कानाचा पडदा, हॉस्पिटलमध्येह्रूदयाच्या झडपा, आण्तरकर्ण अस्थी, इतर हाडान्चे महत्वाचे भाग

 साधारणतः  एका देहदानाने ४३ रुग्णांचा फायदा होऊ शकतो.

 मात्र रुग्ण ICU असणे आवश्यक हॉस्पिटलच्या तद्न्य समितीने रुग्णमेंदू mrut” जाहीर करणे आवश्यक! घरी म्रुत्यु झाल्यास अवयवदान शक्य नाही! हॉस्पिटलमध्ये असतांना रुग्णास सलाईन, प्राणवायू, . चालू असल्याने इतर अवयव जिवंत असतात! मगच त्या अवयवांचे प्रत्यारोपण होऊ शकते! अर्थातच वारसांच्या संमतीने, सहीने! अवयवदान घेणाऱ्या रुग्णांचे नांव गुप्त असते (सरकारी नियमाप्रमाणे).

      काही शंका असल्यास जरूर संपर्क करावा!